राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले
अकोला,दि.5(जिमाका)-केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत देण्यात
येणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कार (सन 2017-18
व 2018-19) नामांकनासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. हे नामांकन प्रस्ताव केंद्रशासनाच्या https://innovate.mygov.in/national
-youth-awards-2018 व https://innovate.mygov.in/national-youth-awards-2019 या ऑनलाईन पोर्टलवर शुक्रवार दि.२६ जून पर्यंत
स्विकारण्यात येणार आहे. या ऑनलाईन प्रस्तावाची एक प्रत दि. 26 जुन पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे सादर करावी.अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला
येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा,असे आवाहन
प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा