पालकमंत्र्यांनी दिली बोरगाव मंजू व वाशिंबा येथील उद्योगांना भेट: उद्योगपूर्ण गाव ही संकल्पना राबविण्यावर भर- ना. कडू


अकोला,दि.१६(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज बोरगाव मंजू व वाशिंबा येथील लघु उद्योगांना भेट दिली.    विविध प्रकारे गावांच्या संकल्पना राबवून झाल्या. मात्र गावाचा विकास करण्यासाठी उद्योगपूर्ण गाव ही संकल्पना राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,असे  मत त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
बोरगाव मंजू येथील लघु उद्योग केंद्रात  ३५ उद्योजक मिळून एक टेक्सटाईल क्लस्टर तयार करीत आहेत. त्या क्लस्टरमध्ये धागा तयार करुन ते कापड बनविण्यापर्यंतचे २० युनिटस आहेत.  या प्रकल्पासाठी बॅंक अर्थसहाय्याचे प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन ना. कडू यांनी उपस्थित उद्योजकांना दिले.
त्यानंतर त्यांनी वाशिंबा येथील विठ्ठलराव वानखडे  ग्रामोद्योग वसाहतीस भेट दिली. या ठिकाणी २० लघु उद्योजकांनी अगरबत्ती निर्मितीचा उद्योग सुरु केला आहे.  याठिकाणी ५० हून महिलांना रोजगार मिळाला आहे. या सर्व उद्योजकांना एक ब्रॅण्ड निर्मिती करुन त्याद्वारे त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री ना. कडू यांनी  जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना दिले. यावेळी  जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तेरानिया व अन्य अधिकारी , उद्योजक उपस्थित होते. येथील कामगारांना विमा संरक्षण द्या, असे निर्देशही ना. कडू यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ