उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पूर्ववत:‘वाहन’ आणि ‘सारथी’ या प्रणालींवर आगाऊ वेळ निर्धारित करण्याची सुविधा

अकोला,दि.१७(जिमाका)- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अकोला या कार्यालयातील सर्व प्रकारचे कामकाज सुरु करण्याबाबत परिवहन आयुक्त यांचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने  परिवहन विभागाच्या ‘वाहन’ व ‘सारथी’ या प्रणालींवर  आपल्या कामासाठी आगाऊ वेळ निर्धारणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, असे  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद जिचकार यांनी कळविले आहे.
            परिवहन कार्यालयात वाहन प्रणालीवर होत असलेल्या  विविध कामासाठी आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली (अपॉईन्टमेंट) सुरु करण्यात आली आहे. त्या कामाकरीता कोटा निश्चित करण्यात ला आहे. निश्चित करण्यात आलेल्या   कोटा  एवढी कामे जी अपॉईन्टमेंट घेतलेली अशीच प्रकरणे स्विकारण्यात येतील. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण  करणे योग्यता  प्रमाणपत्राची  दुय्यम प्रत, वाहनाचे हस्तांतरण  , कर्ज बोजा चढविणे  उतरविणेवाहनाचे  ना-हरकत प्रमाणपत्र, बोजा नियमीत करणे, नोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम  प्रत, पत्ता बदलणेना-हरकत प्रमाणपत्र रद्द, बाहेरील राज्यातून आलेल्या वाहनांची  या राज्यात नोंदणी (RMA) वाहनात बदलवित्तदात्याच्या नावे  वाहन चढविणे, वाहनाचे नोंदणी नुतणीकरण  करणे, नोंदणी  चिन्ह रद्द करणे, या सर्व कामांकरीता www.parivahan.gov.in  या संकेत स्थळावर अपॉईन्टमेंट साठी अर्ज  करता येईल
            कार्यालयात सारथी  प्रणालीवर होत असणाऱ्या विविध कामासाठी आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली (अपॉईन्टमेंट) सुरू करण्यात आली आहेत्या कामाकरिता  कोटा निश्चित  करण्यात आला आहे.   निश्चित करण्यात आलेल्या  कोटा एवढी कामे जी  अपॉईन्टमेंट घेतलेली अशीच प्रकरणे स्विकारण्यात  येतील. शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण, नुतनीकरण  या कामाकरीता www.sarathi.parivahan.gov.in  या संकेत स्थळावर अपॉईन्टमेंट साठी अर्ज  करता येईल.
            वरील सर्व कामकाजात समक्ष स्वाक्षरी करिता कार्यालयीन दिवशी सकाळी  दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंतच वेळ  देण्यात आली असुन संबंधीतांनी  स्वाक्षरी करिता समक्ष  खडकी येथील  कार्यालयात यावे
कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक  व्यक्तीस मास्क असणे आवश्यक आहे. शिकाऊ अनुज्ञप्ती साठी येणाऱ्या अर्जदाराकडे मास्क हात  मोजे असणे आवश्यक आहे. तसेच  दोन अर्जदारामध्ये सहा फुटाचे अंतर असणे आवश्यक आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद जिचकार यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

  1. "DEAR BRO,
    YOUR CONTENT IS TOO GOOD. BUT THESE ARTICLE RELETED I HAVE A ARTICLE TOO.
    HOW APPLY FOR LL/DL FULL PROCESS BY UP SARATHI PARIVAHAN

    CHECK NOW" ADMIN SIR , YOUR WEBSITE IS TOO GOOD, I AM IMPESSED YOUR WEBSITE. AND I AM DAILY VISIT YOUR WEBSITE FOR LATEST UPDATE.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ