३१० अहवाल प्राप्तः ६५पॉझिटीव्ह, चार मयत, ७९ डिस्चार्ज


अकोला,दि. २४ (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे  ३१० अहवाल प्राप्त झाले. त्यातील २४५ अहवाल निगेटीव्ह तर ६५ अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान आज दिवसभरात चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर आज दिवसभरात ७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १३०९ झाली आहे.आजअखेर ३३३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ९२८१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८९४२, फेरतपासणीचे १३८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९१८२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ७८७३ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १३०९ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ६५ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात  ६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी प्राप्त अहवालात ५४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ पुरुष रुग्ण हे जिल्हा कारागृहातून संदर्भित आहेत.  उर्वरित ३६ जणांमध्ये १४ महिला आहेत. तर २२ पुरुष आहेत. त्यात एका तीन महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यातील  सात जण तारफैल, सात जण न्यू तारफैल,  दगडीपुल येथील चार जण,  खदान येथील दोन जण, बाळापूर येथील दोन जण, तर उर्वरित  बार्शी टाकळी, कामा प्लॉट,  सिंधी कॅम्प, रामदास पेठ,  सिव्हील लाईन, शिवर,  जीएमसी होस्टेल,  कळंबेश्वर,  जळगाव जामोद,  लहान उमरी,  कान्हेरी गवळी, सिद्धार्थ नगर, आदर्श कॉलनी, परदेशीपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त अहवालात ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. ते खदान, शौकतअली चौक, आदर्श कॉलनी, आळशी प्लॉट, देशमुख फैल, लकडगंज, जुना तारफैल, बोरगाव मंजू, शंकरनगर, बार्शी टाकळी आणि वाशिम येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
चौघांचा मृत्यू
दरम्यान काल (दि.२३) रात्री तीन व आज दुपारी एक असे चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात  सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय पुरुष असून ते दि.१२ रोजी दाखल झाले होते. अन्य एक डाबकी रोड येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून  हे दि.९ रोजी दाखल झाले होते. तर कामा प्लॉट येथील ८० वर्षीय महिला रुग्ण असून ही महिला दि.२१ रोजी दाखल झाली होती. तर आज दुपारी मयत झालेला रुग्ण बाळापूर  येथील ४३ वर्षीय पुरुष असून ते दि.९ रोजी दाखल झाले होते. त्यांचा आज दुपारी उपचार घेतांना मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
७९ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३४ जणांना व  डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात स्थापण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथून  ४५  जणांना, असे आज एकूण ७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या ३४ रुग्णात सिंधी कॅम्प येथील पाच, बाळापुर येथील तीन, तर खदान, जीएमसी क्वार्टर, मलकापूर, तारफैल, डाबकी रोड, जुने शहर येथील प्रत्येकी दोन जण, तर शंकर नगर, सिंदखेड ता.बार्शी टाकळी, अशोक नगर, माळीपुरा, कळंबी महागाव, कान्हेरी गवळी, दहिहांडा, पातूर, गुलशन कॉलनी, हिंगणा, पवनपुत्र अपार्टमेंट, हरिहरपेठ, चांदुर आणि सिटी कोतवाली येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या ४५ रुग्णांत  खदान येथील आठ, सिंधी कॅम्प येथील तीन, देवी खदान येथील तीन, चांदुर खडकी येथील दोन, खडकी येथील दोन, आदर्श कॉलनी येथील दोन, कैलास टेकडी येथील दोन, काला चबुतरा येथील दोन, हनुमान बस्ती दोन आणि सिटी कोतवाली येथील दोन तर शिवनी, हरिहरपेठ, शिवाजीनगर, न्यु तापडीया नगर, चैतन्य नगर, जठारपेठ, सालासार मंदिराजवळ, टॉवर चौक, शिवर, गुलजारपुरा, देशमुख फैल, पक्कीखोली, पातूर, तार फैल, रामदास पेठ, डाबकी रोड, बिर्ला कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोवीड केअर सेंटर येथून देण्यात आली.
३३३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १३०९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ७१ जण (एक आत्महत्या व ७० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण व्यक्तींची संख्या ९०५ आहे. तर सद्यस्थितीत ३३३   पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ