२६२ अहवाल प्राप्तः १४ पॉझिटीव्ह, ५२ डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि.३०(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे  २६२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २४८ अहवाल निगेटीव्ह तर १४ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १५५० झाली आहे. आज दिवसभरात ५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.तर दोन जणांचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे.आजअखेर ३२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ११०२१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०६६०, फेरतपासणीचे १४४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २१७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १०९५२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ९४०२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १५५० आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज १४ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात  १४  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व सात पुरुष आहेत.  त्यातील दोघे बाळापूर येथील, दोघे अकोट येथील, तर चिखलगाव, सिंधी कॅम्प, कळंबेश्वर, डाबकीरोड व शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुष आहेत.  ते मोठी उमरी,  जुने शहर, डाबकी रोड, बाळापूर व मालेगाव जि. वाशीम येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
५२ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८ तर कोविड केअर सेंटर मधून २४ अशा ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आलेल्या २८ जणांपैकी शंकरनगर येथील तीन जण,  गुलजार पुरा व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित शिवनी, लाडिसफैल, कळंबेश्वर, दुर्गानगर, हरिहरपेठ, फिरदौस कॉलनी, खडकी, चांदूर खडकी, शिवसेना वसाहत, कौलखेडा, अकोट,  कमला नेहरू नगर,  जीएमसी,  लक्ष्मी कॉलनी,  अनिकट पोलीस लाईन, बार्शी टाकळी, गीतानगर, तारफैल, अकोट फैल, राजीव गांधी नगर, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. तर २४ जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात बाळापूर येथील सहा, अशोक नगर व पातूर येथील प्रत्येकी तीन जण,  शंकरनगर, गंगानगर, अकोट फैल, जुने शहर व अकोट येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित शिवनी व हरिहरपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.
दोघे मयत
दरम्यान काल रात्री दोघांचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. त्यात एक गंगानगर येथील रहिवासी असलेली ७४ वर्षीय महिला आहे. ही महिला  दि.१४ जून रोजी दाखल झाली होती. तर अन्य एक अकोट येथील  ५६ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण दि.२७ रोजी दाखल झाला होता.
३२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण १५५० पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७९ जण (एक आत्महत्या व ७८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ११४५ आहे. तर सद्यस्थितीत ३२६  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ