१०१ अहवाल प्राप्तः १२ पॉझिटीव्ह, दोन मयत

अकोला,दि.१२(जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १०१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८९ अहवाल निगेटीव्ह तर १२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज दोन महिला रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.  तर सायंकाळी १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर  उर्वरित १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ९८५ झाली आहे. आजअखेर ३१४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी  दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ७१८१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६८८१, फेरतपासणीचे ११६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७१५९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६१७४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ९८५ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज १२ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला असून चार पुरुष आहेत. ते  रजपुतपुरा,  बेलोदे लेआऊट हिंगणारोड, गायत्रीनगर कौलखेडा,  हरिहरपेठ व बाळापूर येथील रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात दोन महिला असून पाच पुरुष आहेत. ते हरिहरपेठ, अकोट फ़ैल, मोठी उमरी,चांदुर खडकी रोड, शंकर नगर, वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
दोन महिला मयत
दरम्यान आज दोन महिला रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू  झाला आहे. त्यातील एक ५२ वर्षीय महिला ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून  दि.१० रोजी दाखल झाली होती. तिचा काल (दि.१२) रात्री उपचारा दरम्यान  मृत्यू झाला. तर अन्य महिला ही ८० वर्षीय महिला असून  ही महिला देशपांडे प्लॉट जुनेशहर येथील रहिवासी आहे. ही महिला दि.रोजी दाखल झाली होती. आज सकाळी  तिचा मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
१९ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज सायंकाळी १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १२ महिला व सात पुरुष आहेत.त्यातील सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील दोघे खडकी, दोन रामदास पेठ, दोन ध्रुव अपार्टमेंट, दोन सिंधी कॅम्प तर उर्वरीत जयहिंद चौक, श्रीहरी नगर, सिटी कोतवाली, आळेगाव पातूर, गजानन नगर, जुने शहर, हरिहर पेठ, माळीपूरा, रणपिसेनगर, हैदरपुरा व खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३१४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ९८५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ४६ जण (एक आत्महत्या व ४५ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ६२५  आहे. तर सद्यस्थितीत ३१४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा