१०८ अहवाल प्राप्तः३०पॉझिटीव्ह, दोन मयत, २६ डिस्चार्ज


अकोला,दि.६(जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १०८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७८ अहवाल निगेटीव्ह तर ३० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या आठ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित १८ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान आज दुपारी दोन रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ७५६ झाली आहे. तर आजअखेर १८९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ५९९१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५७१२, फेरतपासणीचे १११ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५९४४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५१८८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ७५६ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ३० पॉझिटिव्ह
आज सकाळी २० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यात सात महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील पाच जण सिंधी कॅम्प, पाच जण देवी खदान, काला चबुतरा येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, तर ताज नगर, बालोदे ले आउट, हरिहर पेठ, खदान, लकड गंज माळीपूरा व लेबर कॅम्प येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.
आज सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सिंधी कॅम्प येथील दोघे तर उर्वरित  गंगानगर जुनेशहर,  गुलजार पुरा, सोनटक्के प्लॉट,  जेतवननगर खदान,  भारती प्लॉट,  गणेशनगर,  व्यंकटेशनगर,  जयहिंद चौक येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.
दोन जण मयत
दरम्यान आज दुपारी दोन जणांचा मृत्यू झाला.  त्यातील एक जण ७० वर्षीय पुरुष असून हा रुग्ण गुलजार पुरा येथील रहिवासी आहे.  हा रुग्ण  दि.३ रोजी दाखल  झाला होता. आज उपचार घेतांना मयत झाला. तर अन्य रुग्ण ही ४० वर्षीय महिला असून ती शरीफ नगर जुने शहर येथील रहिवासी आहे. ही महिला दि.२७ मे रोजी दाखल झाली होती.  तिचा आज दुपारून उपचार घेतांना मृत्यू झाला.
२६ जणांना डिस्चार्ज
तसेच आज दुपारनंतर २६ जणांना डिस्चार्ज दिला. त्यातील आठ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित १८ जणांना संस्थागत अलगीकरणात  निरीक्षणाखाली  ठेवण्यात आले आहे. त्यात ११ महिला तर १५ पुरुष आहेर. त्यातील  अकोट फैल येथील १०,  खदान येथील पाच,  रामदास पेठ येथील तीन तर देशमुख फैल, तारफैल,  गायत्रीनगर,  हरिहरपेठ, सोनटक्के प्लॉट, न्यू तारफैल, न्यू तापडीया नगर, जुल्फिकार नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
१८९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ७५६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३६ जण (एक आत्महत्या व ३५ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज २६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ५३१  झाली आहे. तर सद्यस्थितीत १८९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ