नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा होणार आंतरराष्ट्रीय योग दिन


     अकोला,दि.१७(जिमाका)- कोवीड १९ या साथरोगामुळे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन एकत्रित आयोजित न करता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालतामार्फत शहरातील योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थाद्वारा नाविन्यपूर्ण आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी  गणेश कुलकर्णी यांनी दिली आहे.
यासंदर्भात दिलेल्या माहितीपत्रकात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केला आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. त्याअनुषंगाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.
त्यानिमित्ताने रविवार दि.२१ जून रोजी  सकाळी साडेसहा वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनी शहरातील उंच इमारतीच्या छतावर तज्ज्ञ योग साधक त्यांचे साधकासह उपस्थित राहुन योगाचे प्रात्याक्षिके करतील व ध्वनीक्षेपणाद्वारे माहिती देतील. त्यानुसार त्या परिसरातील इमारतीच्या टेरेस,  गॅलरी व परिसरामध्ये प्रत्येक नागरीकाने तज्ज्ञ योग साधकाच्या दिशा निर्देशानुसार व आयुष मंत्रालयाच्या https://youtu.be/zllkkMDBfdM या लिंक मध्ये दिलेल्या प्रोटोकॉलनुसार वैयक्तिक स्वरुपात शासनाने व प्रशासनाने  कोवीड 19 या साथरोगा बाबत घ्यावयाच्या खबरदारी बाबत दिलेल्या सुचनांचे योग्य पालन करुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावयाचे आहे. तथापि शहरातील ज्या भागात वरील  योग प्रात्याक्षिके  व ध्वनीक्षेपकाची सुविधा उपलब्ध राहणार नाही अशा भागात नागरीकांनी आपल्या इमारतीचे टेरेसरवर, घरात मोकळ्या जागेत योगसाधना करुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा.
योग दिन साजरा करण्यासाठी निवड केलेल्या इमारती व प्रशिक्षक/संस्थेचे नावे याप्रमाणे-
1
महावैष्णवी रेसीडेंसी क्रमांक 6, जवाहरनगर चौक,
श्री अरविंद जोग, विश्वास योग व निसर्गपोचार केंद्र
2
राजरत्न रेसीडेंसी डॉ फडके हॉस्पीटल जवळ, जवारनगर चौक
सौ. माया भुईभार, अजिंक्य योग वर्ग रामदासपेठ, अकोला
3
यत्नशिल अपार्टमेंट न्यु भागवत प्लॉट,
सौ. मनिषा गिरीश नाईक, चैतन्य योग फाउंडेशन
4
गिता भवन, शिवाजी पार्क समोर
श्री संदीप बाहेती अकोला
5
सिध्देश्वर गणराया अपार्टमेंट, सिध्दीविनायक मंदीरासमोर
सौ. शुभांगी वझे व डॉ. गजानन वाघोडे, बालशिवाजी योग वर्ग
6
कुसुवंत अपार्टमेंट, मोहिते प्लॉट, मारोती मंदीराजवळ
श्री प्रशांत उंबरकर गुरुजी
7
मुरलीधर टॉवर, बाराजोर्तिलिंग मंदीराजवळ
सौ. श्वेता बेलसरे
8
राजेंद्र रेसीडेंसी, गजाननपेठ, उमरी, अकोला
सौ. निता शरद भागवत, (युथहॉस्टेल ऑफ इंडिया अकोला युनिट)
9
जुने छाया मंगल कार्यालय, एलआयसी ऑफीस, अकोला
स्फुती योगा, श्री सौरभ भालेराव,
10
हिम्मतलाल ब्रदर्स इमारत, जुना शितला माता मंदीरा जवळ
श्री प्रशांत वाहुरवाघ, श्री अविनाश वतसकर अजिंक्य फिटनेस पार्क, अकोला
11

श्री सुहास काटे, पंताजली योग समिती
12
फडकेनगर हनुमान मंदीराचे मागे
श्री पुरुषोत्तम आवळे, पंताजली योग समिती

 याप्रमाणे शहरातील विविध भागात नाविण्यपुर्ण योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक भागात नाविण्यपुर्ण योग दिन साजरा होण्यासाठी इमारती तसेच  प्रशिक्षक/संस्थांची तयारी असल्यास अशा योग प्रशिक्षकांनी अधिक माहितीसाठी धनंजय भगत, अजिंक्य फिटनेस पार्क, केडीया प्लॉट, उमरी रोड, अकोला संपर्क क्रमांक 9764787267 व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन  प्रभारी  जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी केले आहे.         
००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ