कोविड केअर सेंटरला होमिओपॅथी औषधांचे मोफत वितरण


अकोला,दि.१४(जिमाका)-  येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वसतीगृहांमध्ये असणाऱ्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल असलेल्या संदिग्ध व  सौम्य लक्षणांनी युक्त रुग्णांना आज होमिओपॅथीतील  सेपिया या औषधाचा उपचार देण्यात आला. शहरातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी जाऊन उपचार दिले. पायाच्याअंगठ्यावर या औषधाचे थेंब टाकून हा उपचार दिला जातो. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
 अकोला शहरातील डॉ. संजय राऊत, डॉ. अनुराग पांडे, डॉ. प्रविण इंगळे, डॉ. सुनिल बिहाडे,  डॉ. कमल अलिमचंदानी, डॉ. नरेश गोंड, आणि डॉ. कृष्णकांत शर्मा हे उपस्थित होते. यासंदर्भात मुंबई येथील होमिओ तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल विजयकर यांनी संशोधन केले आहे,असे डॉ. राऊत यांनी सांगितले. आज ५२ जणांना या औषधीचा उपचार देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ