मदतीचा ओघ सुरुच;आजअखेर जिल्ह्यात एक कोटीच्यावर मदत निधी जमा


अकोला, दि. १७ (जिमाका)- कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉक डाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नागरिकांचा सेवाभावी संस्थांचा मदतनिधी देण्याचा ओघ सुरुच आहे. आज पर्यत जिल्ह्या एक कोटी ४४ हजार ३९४  रुपयाचा मदत निधी जमा झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे यांनी दिली आहे.
            जिल्ह्या आज र्यं प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी २६ धनादेश प्राप्त झाले असून ते १६ लक्ष ७८ हजार ५०० रुपये इतक्या निधीचे आहे. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १७४ धनादेश प्राप्त झाले असून त्याव्दारे ८३ लक्ष ६५ हजार ८९४ इतक्या रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे.  जिल्ह्यात असा एकूण एक कोटी ४४ हजार ३९४ रुपयाचा मदत निधी प्राप्त  झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना