227 अहवाल प्राप्तः 29 पॉझिटीव्ह, दोन मयत, 10 डिस्चार्ज



अकोला,दि. 21 (जिमाका)-आज दिवसभरात(सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे  227  अहवाल प्राप्त झाले. त्यातील 198 अहवाल निगेटीव्ह तर 29 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील 5 जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर  उर्वरित 5 जणांना घरी सोडण्यात आले आहे.  तसेच आज दोन जणांचा मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1192 झाली आहे.आजअखेर 364 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण 8606 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 8284, फेरतपासणीचे 134 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 188 नमुने होते. आजपर्यंत एकूण 8568 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 7376 आहे.तर पॉझिटीव्ह अहवाल 1192 आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज 29 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात  29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी प्राप्त अहवालात 15जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पांच महिला व दहा पुरुष आहे. त्यात शंकर नगर व गुलजारपूरा येथील प्रत्येकी तीन, अकोट फाईल येथील दोन तर गीतानगर, सिंधी कॅम्प  अकोट, साबरीपुरा इंदिरानगर, वाशिम बायपास, वृंदावन नगर, नाना उजवणे जवळ, लाडीजफाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत.
तसेच आज सायंकाळी चौदा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व सात पुरुष आहे. त्यातील अकोट, शंकर नगर व लाडीज फाईल  येथील प्रत्येकी दोन तसेच शेगांव जि. बुलडाणा, वाडेगांव, हरिहर पेठ, जूने शहर, कोळंबी महागांव, अशोक नगर, मोचीपुरा आणि लक्ष्मी नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील सात अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत.

दोन मयत
दरम्यान आज(दि. 21) रोजी उपचार घेताना दोन रुग्णाचा मृत्यू झाला. त्यापैकी यात नायगांव येथील 48 वर्षीय पुरुष रुग्णांचा आज (दि. 21) रोजी मृत्यू झाला असून ते  दि. 8 जून रोजी दाखल झाले होते. तसेच शेगांव जि. बुलडाणा येथील 50 वर्षीय महिला रुग्णांचा काल (दि. 20)  मृत्यू झाला असून ती दि. 19 जून रोजी दाखल झाली होती.
10 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात पाच जणांना घरी सोडण्यात आले तर पाच जणांना कोविड केअर सेंटर येथे  निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात नऊ पुरुष आणि एक महिला आहेत. त्यात  अकोट फाईल येथील चार, धोबी खदान व गुलजारपुरा येथील प्रत्येकी दोन, रेल्वे क्वॉर्टर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
364 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत 1192 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील 66 जण (एक आत्महत्या व 65 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण व्यक्तींची संख्या 762 आहे. तर सद्यस्थितीत 364  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ