87 वर्षाच्या वृध्दाने हरवले कोरोनाला


        अकोला,दि. 19 (जिमाका)- सर्दि, पडसा व थोडासा ताप आल्यामुळे राऊतवाडी, अकोला येथील 87 वर्ष वयोवृध्द यांना खाजगी डॉक्टरच्या सल्लानुसार दि.22 मे रोजी अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संदिग्ध रुग्ण म्हणून भरती करण्यात आले. त्यांचा घसाचा स्वॅब घेवून 24 मे रोजी तपासणीत ते कोरोनि पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यांना वार्ड 29 मध्ये भरती करण्यात येवून उपचार  करण्यात आले. त्यांच्या योग्य  उपचार झाल्यामुळे दि. 17 जून रोजी त्यांच्या रिपोर्ट निगेटिव्ह झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात झाला. अशा प्रकारे 87 वर्षाच्या वृध्दाने कोरोनाला हरवले आहे.
            मनोगत व्यक्त करतांना सदर वयोवृध्द गृहस्थ म्हणतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची वार्ड क्र.29 30 मध्ये वार्डाची तसेच बाथरुम संडासची व्यवस्था अतिशय स्वच्छ होती येथील व्यवस्थेबद्दल कौतुक करत त्यांनी दर अर्धा-एक तासाने वार्ड, बाथरुम व संडास स्वच्छ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले.
            जेवण, नास्ता व चहा वेळेवर मिळत होता. जेवणामध्ये पोळी, भाजी व वरण सोबत अंडी सुध्दा मिळत होती तसेच नास्ता हा प्रथिनेयुक्त असा होता. त्यांना जेवन नास्ता बद्दल समाधान व्यक्त केले.
            दवाखान्यातील व्यवस्था उत्तम होती. डॉक्टरांनी  वेळोवेळी भेट देवून प्रत्यक्षात काळजी घेतली. त्यामुळे माझी तब्येत लवकर चांगली झाली व त्यांनी प्रशासनाचे आरोग्य विभागाचे कौतुक आभार मानले व दवाखान्याच्या कारभारावर समाधान व्यक्त केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ