रुग्णांना द्या महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश


अकोला,दि.११(जिमाका)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणाऱ्या नॉन कोविड रुग्णांना महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचा  लाभ मिळवून द्या. त्यासाठी आदेश जारी केले असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नित रुग्णालयांमधून रुग्णांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करुन द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी कोरोना उपाययोजनांसंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी  आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी  गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. श्यामकुमार शिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

 यावेळी  नूतन अधिष्ठाता डॉ. गजभिये यांच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक असल्याने सविस्तर आढावा घेण्यात आला.  जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या कोविड उपचारांसाठी दाखल रुग्णसंख्या पाहता, तेथील अन्य आजारांच्या रुग्णांसाठी  पूरक व्यवस्था होणे गरजेचे आहे. तसेच शासनाने  महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या उपचार सुविधा व लाभार्थी गटाची मर्यादा वाढविली आहे. त्यादृष्टिने नॉन कोवीड रुग्णांना उपचारासाठी महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या संलग्नित  रुग्णालयात दाखल करुन त्यांना विनामूल्य उपचार सुविधा द्या. तसेच  त्यासाठी  स्वतंत्र यंत्रणेची व्यवस्था करा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यांनी संयुक्त पणे राबवावयाच्या उपाययोजनांचीही यावेळी चर्चा करण्यात आली. मनुष्यबळ व उपलब्ध यंत्र सामुग्रीचा तसेच अन्य आवश्यक बाबींचाही यावेळी आढावा घेण्यात आला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ