१०६ अहवाल प्राप्तः आठ पॉझिटीव्ह, दोन मयत


अकोला,दि.८(जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १०६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९८ अहवाल निगेटीव्ह तर आठ  अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर  पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या  दोन जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित तिघांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान आज दिवसभरात दोन रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ८२१ झाली आहे. तर आजअखेर २३७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ६३०० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६०२०, फेरतपासणीचे ११२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६२२६ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५४०५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ८२१ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज आठ पॉझिटिव्ह
आज सकाळी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व सात पुरुष आहेत. त्यातील दोन जण रजपुतपुरा येथील रहिवासी आहेत तर उर्वरित बेलोदे ले आउट, नीता गेस्ट हाऊस कलाल की चाल, अकबर प्लॉट अकोट फ़ैल, हनुमान बस्ती संतोषी माता मंदिर,माळीपूरा, गायत्री नगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळच्या अहवालात एकही जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
दोन जण मयत
दरम्यान आज पहाटे एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. हा रुग्ण नायगाव येथील ४५ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण दि.३ जून रोजी दाखल झाला होता, त्याचा आज पहाटे मृत्यू झाला. दरम्यान आज दुपारी पुन्हा एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. ही रुग्ण हैदरपुरा खदान येथील ३६ वर्षीय महिला असून हा रुग्ण दि.२ जून रोजी दाखल झाली होती, तिचाआज मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
पाच जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारून पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला.त्यात एक महिला व अन्य चार पुरुष रूग्ण आहेत. त्यातील दोन जणांना घरी तर उर्वरित तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यातील तिघे जण सिटी कोतवाली परिसरातील तर अन्य देशमुख फ़ैल व गायत्री नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
२३७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ८२१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३९ जण (एक आत्महत्या व ३८ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज पाच जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ५४५  झाली आहे. तर सद्यस्थितीत २३७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ