मोफत वितरणासाठी तूर व चना डाळ, आख्खा चना व तांदूळाचे नियतन प्राप्त


अकोला,दि.८ (जिमाका)-  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर  जिल्ह्यात शिधापत्रिकेवर तूर व चना डाळ, तसेच   शिधापत्रिकाधारक नसलेल्या लोकांनाही मोफत तांदूळ व आख्खा चणा देण्यासाठी  जिल्ह्याला नियतन प्राप्त झाले असून हे नियतन तहसिल पातळीवर  पोहोच झाले असून  रास्त भाव दुकानदारांमार्फत त्याचे वितरण सुरु आहे, या लाभार्थ्यांना हे धान्य वितरण करण्याच्या सुचनाही यंत्रणेस देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी, एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल केशरी शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना तसेच विशिष्ट आपद्कालीन परिस्थितीत केन्द्र शासनाच्या प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत विहीत अन्नधान्य जुन महिन्याच्या नियमित नियतनासह वितरीत करण्याच्या सुचना यापुर्वीच निर्गमित करण्यात आल्या आहेत.
 तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत माहे एप्रिल ते जुन २०२० या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह एक किलो डाळ या परिमाणात (तुरदाळ व चणादाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत ) मोफत वितरीत करण्याकरिता नियतन प्राप्त झाले आहे. तालुकानिहाय डाळ गोदामात पोहोच झाली असुन त्याचे वितरण रास्तभाव दुकानदारांना सुरु आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना वाटप करणेबाबतच्या सुचना तहसिलदार व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना देण्यात आल्या आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील १९ मे च्या शासन निर्णयानुसार आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच कोणत्याही राज्य शासनाच्या योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना माहे मे व जुन २०२० या दोन महिन्याच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो तांदुळ मोफत वितरीत करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार  जिल्हा पुरवठा कार्यालयाने मंजुर नियतन एकुण ६६४० क्विंटल तांदळाची उचल केली  आहे व तहसिलनिहाय नियतन दिले आहे. तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील दि. २७ मेच्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्याना अख्खा चणा प्रति कुटुंब एक किलो मोफत देण्याकरिता मे व जुन या दोन महिन्याच्या कालावधीकरिता मंजुर नियतन एकुण ३१० क्विंटल देण्यात आले असून तहसिलनिहाय नियतन दिले आहे. त्याचे वितरण रास्तभाव दुकानदारांना व्दारपोच करणे सुरु आहे.
लाभार्थी निवडीचे निकषः
अ) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे. परंतु अद्यापर्यंत शिधापत्रिका प्राप्त न झालेले व्यक्ती.
आ) अन्नधान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्टया दुर्बल विस्थापित मजुर, रोजंदारी मजुर.
इ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्याच्या संगणकीकृत करण्याकरिता प्रलंबित असलेले सर्व शिधापत्रिकाधारक.
ई) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजनेतील शिधात्रिकाधारक यातुन पुर्णपणे वगळण्यात येतील.
वितरणातील कार्यपध्दती:
अन्नधान्याची वितरण केंद्र निश्चिती, केंद्रप्रमुख निश्चित करणे अन्नधान्य वितरण अधिकारी अकोला यांचेव्दारे दहा केंद्र निश्चित करण्यात आले असुन केंद्रचालक/रास्तभाव दुकानदार पुढीलप्रमाणे आहे.
पंकज अवस्थी जठारपेठ,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत गौरक्षण रोड,
श्रीमती पुषाबाई सरोदे सिंधी कॅम्प,
मिनिस्टीयल सोसायटी कलेक्टर ऑफीस जवळ,
शत्रुघ्न मुंडे हरिहर पेठ, समाजसेवासह सोसायटी डाबकी रोड,
अनिल परचुरे जयहिंद चौक, फेअर प्राइज शॉप(५१)लक्कडगंज,
राजु चौधरी अकोट फैल,
युनुस नियाजी, बैदपुरा
तसेच तहसिल क्षेत्रामध्ये स्वस्तधान्य दुकानदार हा केंद्रप्रमुख असेल व त्या क्षेत्रासाठी स्वस्तधान्य दुकानदारामार्फत धान्याचे वाटप करण्यात येईल. प्रत्येक दहा स्वस्तधान्य दुकानांसाठी एका संपर्क अधिकाऱ्याची नेमणुक करणे, एका विहीत केलेल्या केंद्रावरील लाभार्थी दुसऱ्या केंद्रावर जाऊन तांदळाचा लाभ घेणार नाही याची दक्षता घेणे, तसेच प्रत्येक वितरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी Social Distance नियमांचे पालन करणे आवश्यक राहील याबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी व सर्व तहसिलदार यांना सुचना देण्यात आल्या आहेत. विनाशिधापत्रिका लाभार्थ्यांना ऑनलाईन ई-पॉस मशिनव्दारे धान्याचे वितरण करण्यात येईल. त्यासाठी लाभार्थ्याचा प्रमाणित आधारकार्ड क्रमांक आवश्यक असेल, लाभार्थ्याचे नाव, आधारकार्ड क्रमांक, धान्य वाटप दिनांक, मोबाईल क्रमांक (असल्यास) इत्यादी गोष्टींची आवश्यक तपशिलात समावेश आहे,असे  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ