अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाज्मा युनिट कार्यान्वित;पहिल्या दिवशी दोघांनी केले प्लाज्मा दान


अकोला,दि.२९(जिमाका)- अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  प्लाज्मा फोरेसिस युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  करण्यात आले. दरम्यान अकोला येथील  प्लाज्मा युनिट मध्ये पहिल्याच दिवशी दोघांनी आपले प्लाज्मा दान केले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू अमरावती येथून  तर अकोला येथून   जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. राजकुमार चव्हाण, तसेच डॉ. प्रदिपकुमार उमप, विभाग प्रमुख, विकृतीशास्त्र विभाग, वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनेश नैताम, प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख इतर कर्मचारी उपस्थित होते.
            शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील प्रोजेक्ट प्लॅटिना प्रणाली उपचार द्धती राबविण्यासाठी डॉ. प्रदिप उमप, विभाग प्रमुख, विकृतीशास्त्र विभाग हे नोडल  अधिकारी, डॉ. सुनिता आडे, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग ह्या मुख्य संशोधक, डॉ. श्रीराम चोपडे, सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र विभाग, डॉ. पियुष गुप्ता, सहाय्यक प्राध्यापक, छाती दमा रोग विभाग हे सहयोगी संशोधक म्हणुन कार्यरत असतील. या चमुला मदत करण्यासाठी डॉ. आशिष शिंदे, डॉ. तपश्या भारती, हेमंत मातुरकर, रामकृष्णा खोदरे सहाय्यक म्हणुन कार्यरत असतील. आज पहिल्या दिवशी दोन कोरोनामुक्त व्यक्तींचे प्लाज्मा संकलन करण्यात आले अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ