८९ अहवाल प्राप्तः१४ पॉझिटीव्ह,१७ डिस्चार्ज


अकोला,दि.५ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ८९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७५ अहवाल निगेटीव्ह तर १४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या सात जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित १० जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ७२६ झाली आहे. तर आजअखेर १८७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ५८९७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५६१९, फेरतपासणीचे १११ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५८३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५११० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ७२६ आहेत. तर ६१ अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज १४ पॉझिटिव्ह
आज सकाळी प्राप्त झालेल्या १४ पॉझिटिव्ह अहवालात सात पुरुष आणि सात महिला आहेत. यातील रुग्णांपैकी दोन जण गुलजारपुरा, दोन सिंधी कॅम्प,दोन हैदरपुरा तर उर्वरित गोरक्षण, गवळीपूरा, पातूर, बिर्ला कॉलनी, अकोट फ़ैल, बैदपुरा, जुने शहर, मोहतामिल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळच्या अहवालात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही.
१७ जणांना डिस्चार्ज
दुपारनंतर १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सायंकाळी १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सात जणांना घरी सोडण्यात आले तर १० जणांना संस्थागत अलगिकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात नऊ महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील आदर्श कॉलनी येथील दोन, रजपुतपुरा येथील दोन, अण्णाभाऊ साठे नगर येथील दोन जण, तर लक्ष्मी नगर डाबकी रोड, गोरक्षण रोड, गायत्री नगर, तार फ़ैल, रामदास पेठ, गुलजारपुरा, इरानी वस्ती, खदान, सिटी कोतवाली, मोहता मिल,तोष्णीवाल ले आउट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.,  अशी माहिती शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
१८७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ७२६जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३४ जण (एक आत्महत्या व ३३ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज १७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ५०५  झाली आहे. तर सद्यस्थितीत १८७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ