१३६ अहवाल प्राप्तः २० पॉझिटीव्ह, दोन मयत


अकोला,दि.१०(जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १३६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ११६ अहवाल निगेटीव्ह तर २०  अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज दोन रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ८८४ झाली आहे. तसेच आज दिवसभरात ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,तर आजअखेर २६५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी  दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ६७८१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६४९१, फेरतपासणीचे ११२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १७८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६७३० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५८४६ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ८८४ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज २० पॉझिटिव्ह
आज सकाळच्या अहवालात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. तर सायंकाळच्या अहवालात २० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १० पुरुष रुग्ण आहेत. त्यातील ११ जण हे इंदिरानगर वाडेगाव येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित  सावकारनगर आपातापा रोड,  कौलखेड हिंगणाफाटा, देशपांडे प्लॉट,  वाठुरकरनगर मंगरुळपीर रोड,  सिंदखेड ता. बार्शी टाकळी, देवी पोलीस लाईन,  विजय नगर, जुने शहर व हांडे प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
३२ जणांना डिस्चार्ज
 आज दिवसभरात ३२ जणांना डिस्चार्ज दिला . त्यात सकाळी १४ जणांना डिस्चार्ज दिला.त्यातील नऊ जण कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ महिला तर पाच पुरुष आहेत. त्यातील तिघे सिव्हिल लाईन येथील, तिघे हरिहरपेठ येथील, दोघे अकोट फ़ैल येथील तर उर्वरित हिंगणारोड, आंबेडकर नगर, गुरुनानक नगर, गायत्री नगर, सिटी कोतवाली व माळीपूरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज दुपारनंतर  आणखी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील १४ जणांना घरी तर उर्वरित चौघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सहा महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील तिघे गायत्री नगर येथील, तिघे खदान येथील, दोन जण काला चबुतरा येथिल तर उर्वरित कौलखेड, रामदास पेठ,  जुनेशहर,  मुजफ्फर नगर, संताजीनगर, बेलोदे लेआऊट, भरत नगर, खडकी, सिटी कोतवाली  व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
दोन जण मयत
दरम्यान आज दिवसभरात उपचार घेताना दोन जणांचे निधन झाले. त्यातील एक ६२ वर्षीय इसम गाडगे नगर हरिहरपेठ येथील रहिवासी असून तो दि.६जून रोजी दाखल झाला होता.  तर दुसरा रुग्ण ७० वर्षीय इसम असून सोनटक्के प्लॉट  जुने शहर भागातील रहिवासी आहे.  हा रुग्ण दि.२९ मे रोजी दाखल झाला होता. या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
२६५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ८८४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ४२ जण (एक आत्महत्या व ४१ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ५७७  आहे. तर सद्यस्थितीत २६५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ