घरोघरी आरोग्य तपासणीत निदर्शनास आलेल्या लोकांचे दोन दिवसात ३३१ स्वॅब जमा


अकोला,दि.१८(जिमाका)-  महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणातून  निदर्शनास आलेले दुर्धर आजार असलेले, ज्येष्ठ नागरिक, ऑक्सिजन पातळी कमी असलेल्या लोकांचे घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याचे काम सुरु झाले आहे. शहरातील अकोट फैल, खदान या भागातून गेल्या दोन दिवसांत ३३१ स्वॅब जमा करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महानगरपालिका यांच्याकडून  करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरातील अकोट फैल व खदान या प्रतिबंधीत क्षेत्रामधून दुर्धर आजार व ज्या रुग्णामधील ऑक्सिजन पातळीचे प्रमाण कमी आहे. अशा रुग्णाचे स्वॅब घेण्याची मोहिम काल (दि.१७) पासून सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी अकोट फैल भागातून १०३ व खदान परिसरातून ७२ संशयित रुग्णाचे स्वॅब जमा करण्यात आले. आज खदान भागातून ४६ व अकोट फैल परिसरातून ११० असे एकूण १५६ स्वॅब जमा करण्यात आले.  गेल्या दोन दिवसात ३३१ संशयीत रुग्णाचे स्वॅब जमा करण्यात आले आहे, अशी माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे  यांनी दिली आहे. शहरातील अन्य भागातील रहिवासी असणारे दुर्धर आजार व ज्या रुग्णांच्या शरीरात ऑक्सीजन पातळीचे प्रमाण कमी आहे,अशा रुग्णांनी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ