पंढरपूर येथे जाण्यासाठी पासेसची मागणी करु नये- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे भाविकांना आवाहन


अकोला,दि.२७(जिमाका)- आषाढी एकादशीनिमित्त  पंढरपूर येथे जाण्यासाठी पासेस देण्यात येणार नाहीत, तरी कोणिही पंढरपूर येथे जाण्यासाठी पासेसची मागणी करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त पुणे यांचे निर्देशानुसार पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, आषाढी एकादशी दरम्यान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहे, याबाबत जिल्हाधिकारी यांचे नावे पत्र पाठवून, पंढरपूर येथे दर्शनाकरिता पासेस देण्यात येऊ नये, किंवा नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येऊ नये असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणी पासेस ची मागणी करू नये, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारच्या पासेस देण्यात येणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी भाविकांना केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ