१३८ अहवाल प्राप्तः ४० पॉझिटीव्ह, १६ डिस्चार्ज
अकोला,दि.३ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी
सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १३८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९८ अहवाल
निगेटीव्ह तर ४० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर १६ जणांना डिस्चार्ज
देण्यात आला. त्यातल्या तीन जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित १३ जणांना
संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची
एकूण संख्या ६६७ झाली आहे. तर आजअखेर १५५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ५५८३ जणांचे नमुने
पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५३०६, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे १६७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५५५४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या ४८८७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ६६७ आहेत. तर २९ अहवाल प्रलंबित
आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ४० पॉझिटिव्ह
आज सकाळी प्राप्त ३६ पॉझिटिव्ह रुग्णापैकी १४ महिला व २२ पुरुष रुग्ण आहेत.
त्यातील ११जण अकोट फ़ैल येथील, पाच जण देशमुख फ़ैल येथील, कैलास टेकडी येथील तीन, खदान येथील तीन, न्यू तार फ़ैल येथील तीन तर बाखरपुरा अकोट, अनिकट,
बलोदे ले आउट हिंगणा फाटा, ध्रुव अपार्टमेंट
जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर, हिंद चौक, मोठी उमरी, रामदास पेठ, गुलजार
पुरा, तार फ़ैल, हरिहर पेठ, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक जण आहेत. सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व एक पुरुष आहे. ते खदान, अकोट फैल, शिवाजी नगर, संताजी नगर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली
१६ जणांना
डिस्चार्ज
दुपारनंतर १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात चार महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील पाच जण रामदास पेठ येथील , तीन जण अकोट फैल येथील
तर खदान, मलकापूर, सिंधी कॅम्प,
सोनटक्के प्लॉट, कैलास टेकडी, छोटी उमरी, रजपूत पुरा, हरिहरपेठ येथील प्रत्येकी एक या प्रमाणे
रहिवासी आहेत. आज डिस्चार्ज दिलेल्या १६ जणांपैकी तीन जणांना घरी सोडण्यात आले तर
उर्वरित १३ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती शासकिय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
१५५ पॉझिटीव्ह
रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ६६७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३४ जण (एक
आत्महत्या व ३३ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज १६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता
डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ४७८ झाली आहे. तर सद्यस्थितीत १५५ पॉझिटीव्ह रुग्ण
उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल
आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा