११० अहवाल प्राप्तःएक पॉझिटीव्ह, एक मयत,६१ डिस्चार्ज


अकोला,दि. २३ (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे  ११० अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०९ अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान आज पहाटे उपचार घेतांना एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. तर आज दिवसभरात ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १२४४ झाली आहे.आजअखेर ३५१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ८९३२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८५९६, फेरतपासणीचे १३६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २०० नमुने होते. आजपर्यंत एकूण ८८७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ७६२८ आहे.तर पॉझिटीव्ह अहवाल १२४४ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज एकच पॉझिटिव्ह
आज दिवसभरात  केवळ एकच अहवाल पॉझिटीव्ह आला. आज सकाळच्या अहवालात एका महिलेचा अहवाल  पॉझिटीव्ह आला. ही दगडी पूल येथील रहिवासी आहे. तर सायंकाळी एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
एका महिलेचा मृत्यू
दरम्यान आज (दि.२३) पहाटे बाळापूर येथील रहिवासी असलेल्या पन्नास वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. ही महिला दि.१२ जून रोजी दाखल झाली होती. तिचा आज पहाटे तीन वाजता मृत्यू झाला.
६१ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १३ जणांना व  डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात स्थापण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथून  काल (दि.२२) व आज (दि.२३) मिळून ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांत १० पुरुष व तीन महिला आहेत. त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील लक्ष्मी नगर व तारफैल येथील प्रत्येकी तीन,  दोघे विजय नगर येथील तर उर्वरित सिंधी कॅम्प, मलकापूर, डाबकीरोड, चांदुर, बाळापूर येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांत वाडेगाव येथील १३, अकोट फैल येथील आठ, शिवर येथील पाच, रंगारहट्टी बाळापूर येथील चार, तर गायत्रीनगर, गुलजारपुरा, चावरे प्लॉट, जठारपेठ, रजपूतपुरा येथील प्रत्येकी दोन तर शंकरनगर, फिरदौस कॉलनी , मोहता मिल, गितानगर, हरिहरपेठ, सिंधी कॅम्प, संत कबीर नगर, बापूनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोवीड केअर सेंटर येथून देण्यात आली.
३५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १२४४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ६७ जण (एक आत्महत्या व ६६ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण व्यक्तींची संख्या ८२६ आहे. तर सद्यस्थितीत ३५१   पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ