आयएमएच्या डॉक्टर्सची सेवा कोवीड कक्षात; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अकोला,दि.४(जिमाका)- कोवीड
१९ च्या उपचारासाठी शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी दिलेल्या नियोजनानुसार इंडियन मेडीकल असोसिएशन
(आयएमए) शाखा अकोला यांच्याकडील औषध वैद्यक व बधिरीकरण तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार, आयएमएच्या
डॉक्टर्सच्या तीन शिफ्ट मध्ये
नेमणूका करण्यात आल्या असून दि. ५ ते दि.१७ या कालावधीत ५० शिफ्ट मध्ये हे डॉक्टर्स
त्यांची सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
कोवीड कक्षात देतील, असे आदेशात नमूद केले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा