२७७ अहवाल प्राप्तः ३० पॉझिटीव्ह, एक मयत, १८ डिस्चार्ज



अकोला,दि. १९ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २७७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २४७ अहवाल निगेटीव्ह तर ३० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर  उर्वरित ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे.  तसेच आज एकाचा मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ११३६  झाली आहे. आजअखेर ३३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी  दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ८०४२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७७२१, फेरतपासणीचे १३४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ८०१८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६८८२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ११३६ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ३० पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आठ महिला व सात पुरुष आहे. त्यात अकोट फैल येथील पाच, बाळापूर येथील ४, तर जेतवन नगर, कान्हेरी गवळी, भारती प्लॉट, जुने शहर, मोठी उमरी, बार्शी टाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे ‍रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी पंधरा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत.  त्यातील अकोट फैल येथील तिन तसेच सिंधी कॅम्प, धोबी खदान, अशोक नगर येथील प्रत्येकी दोन, तर  उर्वरित अनिकट, आदर्श कॉलनी, हरिहर पेठ, आंबेडकर चौक, अकोट, बाळापूर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
एक मयत
दरम्यान काल(दि.१८) रात्री उपचार घेताना एकाच मृत्यू झाला. त्यात हरिहर पेठ, अकोला  येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू  असून  ते कालच दाखल झाले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
१८ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर १८  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात अकरा जणांना घरी सोडण्यात आले तर सात जणांना कोविड केअर सेंटर येथे  निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात आठ पुरुष आणि दहा महिला आहेत. त्यात खदान येथील तीन जण, सिव्हील लाईन, जूने शहर व माळी पूरा येथील दोन, मोठी उमरी, सोनटक्के प्लॉट, गिता नगर, मनर्कणा नगर, तापडीया नगर, शिवनी, गुलजार पुरा, अकोट, बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३३५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ११३६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ५९ जण (एक आत्महत्या व ५८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ७४२ आहे. तर सद्यस्थितीत ३३५  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.
संपर्काबाहेरिल पॉझिटीव्ह रुग्ण येणाचे प्रमाण कमी
आज झालेल्या २७७ तपासणी पैकी ३० रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहे तर २४७ रुग्ण हे निगेटीव्ह  आले आहे. पॉझिटीव्ह रुग्णाचे प्रमाण १०.३८ टक्के आहे. आज आढळलेले सर्व रुग्ण जून्या संपर्कातील किवा पॉझिटीव्ह रुग्णाच्या कुटुंबातील आहे. त्यापैकी पंधरा रुग्ण पीकेव्ही कॉरन्टाइन सेंटरमधील, दोन रुग्ण बार्शीटाकळी येथील कॉरन्टाईन सेंटरमधील आहे. तर पाच रुग्ण अकोट फैल व जेतवन नगर खदान येथील राबविलेल्या मोहिमेअंतर्गत आहे. उर्वरित पाच रुग्ण बाळापूर येथील व तिन रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आले आहे.  मागील तिन दिवसापासून राबविण्यात येत असलेल्या स्वॅब संकलन मोहिमेमुळे पुढील संसर्ग रोखण्यात मदत झाली आहे व पुढील धोक्यापासून शहराला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ