कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी संशोधन समिती स्थापन करा-पालकमंत्री ना.बच्चु कडू


अकोला, दि. १६(जिमाका)- कोरडवाहू शेती करतांना येणाऱ्या अडचणी, समस्या तसेच त्यातील उत्पादन वाढी करीता उपाययोजना करुन कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी, कृषी विद्यापिठाने ज्ज्ञ लोकांची संशोधन समिती स्थापन करावी, अशी सुचना राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक शैक्षणि मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री ना.ओमप्रकाश ऊर्फ  बच्चू  कडू यांनी आज येथे केल्या.
            येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमेटी हॉल मध्ये कृषी विद्यापिठ कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ना. कडू हे मार्गदर्शन करत होते. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, विधान परिषद सदस्य . अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्र. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वाघमारे, जिल्हा कृषि विकासअधिकारी मुरली इंगळे तसेच विद्यापिठातील शास्त्रज्ञ कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी ना. कडू म्हणाले की, कृषि विद्यापीठाने बियाणे, खते तसेच  मार्केटिं यासारख्या  प्रश्नांवर कार्य करावे. पिक उत्पादनवाढी सोबत शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, यासाठी विद्यापिठाने संशोधन करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापिठाने आपली भुमिका स्पष्ट करुन शासनाकडे सुस्पष्ट पारदर्शक अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात आपली भूमिका मांडतांना ना. कडू म्हणाले की, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर  सिताफळ, पेरु, जांभुळ यासारख्या कमी पाण्यात येणाऱ्या फळपिकाची लागवड करावी, उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव काढतांना विद्यापिठाने परंपरागत द्धतीचा वापर करता नवीन द्धतीचा अवलंबन करावे. कोरडवाहू शेतकऱ्यांसोबत संत्रा उत्पादक, केळी उत्पादक तसेच इतर पिकाचे उत्पादन घेणारा शेतकरी कोणत्या परिस्थिती मुळे अडचणीत आला? यावर संशोधन करावे. तसेच उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी विद्यापिठाने संशोधन करणे आवश्यक असल्याचे  पालकमंत्री ना. कडू यांनी सांगितले.
            . अमोल मिटकरी यांनी दिवठाणा येथील पानवेली संशोधकेंद्र तसेच खारपापट्टा विकास यासंदर्भात चर्चा केली. शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना विद्यापिठाने प्रोत्साहन द्यावे,असे सांगीतले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि  विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी विद्यापिठाने केलेल्या कार्याबाबत माहिती दिली. यावेळी कृषि विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. खर्चे, कृषि विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रदिप इंगोले विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी विद्यापिठाच्या संशोधन, नवनविन वाण, शिक्षण विद्यापिठाने विकसि केलेले यंत्र अवजारांबाबत माहिती दिली. बैठकीचे सुत्रसंचालन आभार प्रदर्शन डॉ. किशोर बिडवे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ