पालकमंत्रीच तिफन चालवतात तेव्हा...


अकोला,दि.१६(जिमाका)-   दुपारी सव्वा बाराच्या सुमारास...राजनापूर खिनखीनी या गावाच्या शिवारातून पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या गाड्यांचा ताफा चाललाय. अचानक रस्त्यात उभ्या एका शेतकऱ्यांने मंत्री महोदयांना आवाज दिला. प्रशांत भानुदास साबळे असे त्या शेतकऱ्याचे नाव. रस्त्याच्या कडेला असलेल्या त्याच्या शेतात पेरणीची  लगबग सुरु आहे.  तिफन लावून बैलजोडी तैनात आहे. मुळचे शेतकरी असलेल्या पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना तिफन चालवण्याची  तीव्र इच्छा होते. त्यासाठी ते  गाडीतून उतरुन शेताकडे धाव घेतात. सोबतचे अधिकारी, पोलीस साऱ्यांनाच कळत नाही नेमके काय चालले ते... तोवर पालकमंत्र्यांनी  बैलाच्या कासऱ्या हातात सुद्धा घेतलेल्या असतात. आणि त्यांनी तिफन चालवायला सुरुवात ही केलेली असते. पालकमंत्र्यांची ही अकस्मिक कृती मात्र उपस्थित साऱ्यांना सुखावून जाते. त्या शेतकऱ्याला अशा श्रमदानातून पेरणीच्या शुभेच्छा देऊन ना. कडू यांनी आपलं काळ्या आईशी, शेती आणि शेतकऱ्याशी असलेलं नातं अधिक दृढ केलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ