२४२ अहवाल प्राप्तः २२ पॉझिटीव्ह, ५७ डिस्चार्ज


अकोला,दि.२६ (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे  २४२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २२० अहवाल निगेटीव्ह तर २२ अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान दिवसभरात ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १३६४ झाली आहे. आजअखेर २४३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ९७७१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ९४२१, फेरतपासणीचे १४३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २०७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९७२२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८३५८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १३६४ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज २२ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात २२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील पाच जण अकोट फैल येथील, तीन जण गुलजारपुरा येथील, तीन जण लाडीस फैल, दोघे हरिहर पेठ येथील तर उर्वरित राधाकृष्ण प्लॉट, आंबेडकरनगर, कमलानेहरू नगर,  तारफैल,  इंदिरा कॉलनी, गाडगेनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एक महिला व दोन पुरुष आहेत. ते सिंधी कॅम्प, दशहरा नगर आणि बाळापूर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
५७ डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात स्थापण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथून ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या ५७ रुग्णात  तारफैल येथील सात जण,  गायत्रीनगर येथील सहा जण,  सिंधी कॅम्प येथील पाच जण,  हरिहरपेठ येथील पाच जण,  मोठी उमरी येथील पाच जण, रामदास पेठ येथील  पाच जण,आदर्श कॉलनी येथील तीन जण, न्यू तारफैल येथील दोन, खदान येथील दोन, बाळापूर येथील दोन तर रजपुतपुरा, चांदुर, शिवसेना वसाहत, अकोट फैल,  अशोक नगर,  कैलास टेकडी, खोलेश्वर, गोकुळ कॉलनी, मोहता मिल,  रेल्वे स्टेशन,  माळीपूरा, खैर मोहम्मद प्लॉट, शिवाजी नगर, लहान उमरी, अकोट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोवीड केअर सेंटर येथून देण्यात आली.
२४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण १३६४ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७४ जण (एक आत्महत्या व ७३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण व्यक्तींची संख्या १०४७ आहे. तर सद्यस्थितीत २४३  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ