स्थलांतरीत आदिवासी मजूरांच्या मदतीसाठी प्रकल्प कार्यालयात स्वतंत्र कक्ष
अकोला,दि.६ (जिमाका)- कोरोना संसर्गाच्या कालावधीत लागू
केलेल्या संचारबंदी कालावधीत स्थलांतरीत आदिवासी मजुर राज्यात व परराज्यातही विविध
ठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यासाठी प्रकल्प अधिकासरी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, अकोला यांच्या कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यातील आदिवासी
स्थलांतरीत मजूरांनी त्यांची माहिती या प्रकल्पस्तरीय कक्षात सकाळी ११ ते सहा या वेळात संपर्क क्रमांकावर ८४५९७८०६९९ व ८६०५५०९६८३ या
क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ज्या क्षेत्रात स्थलांतर केले आहे तेथील प्रशासनाकडे
नोंदणी करुन ई- पास प्राप्त करावा,असे प्रकल्प अधिकारी ममता विधळे यांनी कळविले
आहे.
जर आदिवासी नसले व परराज्यातील व्यक्ती असले तर त्यांचं जाणे संभव होईल का
उत्तर द्याहटवा