१६१ अहवाल प्राप्तः ११ पॉझिटीव्ह, दोन महिला मयत


अकोला,दि.१५ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १६१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १५० अहवाल निगेटीव्ह तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २१८ झाली आहे. दरम्यान काल रात्री उशीरा २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच उपचारादरम्यान दोन महिला मयत झाल्या आहेत. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १०१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २३६३ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २१४५ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण १९२७ अहवाल निगेटीव्ह तर २१८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  २१८ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण २३६३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २१५२, फेरतपासणीचे १०८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०३ नमुने होते. आजपर्यंत एकूण २१४५ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १९३४ तर फेरतपासणीचे १०८ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०३ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १९२७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २१८ आहेत. तर आजअखेर २१८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज ११ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १६१ अहवालात १५० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेला एक रुग्ण हा निसर्ग सोसायटी खडकी येथील रहिवासी असून ३५ वर्षीय पुरुष आहे. तर सायंकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या १० पॉझिटीव्ह रुग्णात पाच जण महिला  व पाच पुरुष आहेत. त्यातील  चार जण आंबेडकर नगर न्यू बसस्टॅण्ड मागे येथील तर दोन  फिरदौस कॉलनी, दोन भिम चौक अकोट फैल येथील तर गवळीपुरा व पंचशिल नगर वाशीम बायपास येथिल प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.
दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झालेली  फिरदौस नगर मधील महिला  ही  काल (दि.१४) मयत झाली होती. ही महिला दि. १२ रोजी दाखल झाली होती. तर आज सकाळी आणखी एक महिला मयत झाली. ही ६५ वर्षीय महिला मोमीनपुरा  येथील रहिवासी असून ती दि. ११ रोजी दाखल झाली होती.
२८ जणांना डिस्चार्ज पैकी २४ निरीक्षणात
काल रात्री व आज सकाळी  उपचार पूर्ण झालेल्या २८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यातील चौघे  जणांना घरी सोडण्यात आले. ते आता घरातच पण क्वारंटाईन राहतील तर अन्य २४ जणांना पीकेव्ही मधील कोवीड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे.
 १०१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत  २१८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १७ जण (एक आत्महत्या व १६ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे  रोजी एकास , मंगळवार दि.१२ मे रोजी ६० जणांना  तर गुरुवार दि.१४ रोजी आधी  १२ व नंतर रात्री उशीरा २८ असे ४० जणांना म्हणजेच एकूण १०० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १०१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ