मनरेगाअंतर्गत जिल्ह्यात ९९७ कामे सुरु; लॉकडाऊन कालावधीत ४४०० मजुरांना रोजगार


अकोला,दि.१८(जिमाका)- महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यात ९९७ कामे सुरु आहेत. लॉक डाऊनच्या या कालावधीत जिल्ह्यात ४४०० मजुरांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात मनरेगा योजनेअंतर्गत  जिल्ह्यात ४४०० मजूरांनी आपला हक्काचा रोजगार मिळवला आहे. जिल्ह्यात ९९७ कामे सुरु असून सद्यस्थितीत १४००० कामे सेल्फवर आहेत आणि मजूरांनी मागणी केल्यास ही कामे लगेच उपलब्ध होणार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात  ५३८ ग्रामपंचायतींपैकी १८२ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरु आहेत. या योजनेत रेशीम उद्योग, रोपवाटीका,  वृक्ष संगोपन, विहीर पुनर्भरण, घरकुल या योजनांची कामे घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या ९९७ कामे सुरु आहेत.  ही कामे करतांना किमान सामायिक अंतर राखणे, मास्क चा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.  यंदाच्या आर्थिक वर्षात शासनाने मजुरीचा दरही २३८ रुपये प्रतिदिन याप्रमाणे केला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे.  जिल्ह्यात सेल्फवर उपलब्ध कामांची संख्या पाहता मजुरांनी आपापल्या ग्रामपंचायतीत जाऊन कामाची मागणी करावी , असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ