२७७ अहवाल प्राप्तः १८ पॉझिटीव्ह,२२ डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि.२५ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २७७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २५९ अहवाल निगेटीव्ह तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.२४) रोजी रात्री आणखी  २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या तिघांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित १९ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. तर आज एका  ४० वर्षीय महिलेचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ४१५ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात १३९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४०३८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३७८७, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३९८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३७३३ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३५६९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ४१५ आहेत. तर आजअखेर ५४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज १८ पॉझिटिव्ह
आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या नऊ रुग्णांपैकी चार पुरुष व पाच महिला आहेत. या रुग्णांपैकी तीन जण हे फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर अन्य महसूल कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर अकोट फैल, देशमुख फैल,अकोट फैल, मोहता मिल नानकनगर, गोकुळ कॉलनी भुईभोर गॅसजवळ अकोट येथील रहिवासी आहेत.
तर, आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या नऊ रुग्णांपैकी सात पुरुष व दोन महिला आहेत. या रुग्णांपैकी दोन जण हे न्यु राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. तर अन्य  रणपिसेनगर, गोरक्षण रोड,  पावसाळे ले आऊट कौलखेड रोड, सिंधी कॅम्प, शिवर, बाळापूर व पातुर येथील रहिवासी आहेत.
२२ जणांना डिस्चार्ज
काल (दि.२४) रात्री २२ जणांना डिस्चार्ज केलं. त्यातील तिघांना घरी तर उर्वरित १९ जणांना संस्थागत अलगिकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. संस्थागत अलगिकरणात असलेल्या १९ जणांपैकी १२ पुरुष तर सात महिला आहेत. त्यातील चार जण फिरदौस कॉलनी, दोन जण इंदिरानगर तेल्हारा,दोन जण सोनटक्के प्लॉट जुने शहर, तर उर्वरित गोरक्षण रोड, जुने शहर, आश्रयनगर डाबकी रोड, काळा मारुती जुने शहर, बिर्ला गेट जठारपेठ, खरप, न्यू खेतान नगर, लोहिया नगर, राजीव गांधी नगर, नानकनगर निमवाडी, बेलखेड ता. तेल्हारा येथील रहिवासी आहेत.तर घरी सोडण्यात आलेल्या तिघांत एक पुरुष असून तो लोखंडे ले आऊट मोठी उमरी येथील तर उर्वरित महिला सीता नगर व मुजफ्फर नगर येथील रहिवासी आहेत.
१३९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ४१५  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २५ जण (एक आत्महत्या व २४ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर काल(दि.२४) रात्री २२ जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता एकूण व्यक्तींची संख्या २५१  झाली आहे. तर सद्यस्थितीत १३९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर ३८५४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २२०९ गृहअलगीकरणात तर १३८ जण संस्थागत अलगीकरणात  असे २३४७ जण अलगीकरणात आहेत. तर १३७२ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १३५ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ