कृषी निविष्ठा थेट बांधावर ;कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वाहनास हिरवी झेंडी


अकोला दिनांक २७(जिमाका)- कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला अंतर्गत कोरोना विषाणूच्या संकटकाळी ‘कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या दारी’ या ब्रीद वाक्यानुसार, शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे कृषी निविष्ठा थेट पुरवठा बाबत खते व बियाणे वाटप राबविण्यात येत आहे. या उपक्रम अंतर्गत कृषी  निविष्ठा वाहनास कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
                        शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे कृषी निविष्ठा थेट पुरवठा बाबत खते व बियाणे वाटप बाबत कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांनी पुढाकार घेत शिवापूर येथील गुरूकृपा शेतकरी स्वयंसहायता गट यांनी आज ११ लाख रुपयांच्या खत व बियाणे थेट बांधावर वाटप करण्या करता उचल केली. यामुळे  प्रत्येक शेतकऱ्याला एका बॅग मागे चाळीस ते पन्नास रुपये रूपयाची बचत होणार. या संपूर्ण योजनेमुळे शेतकऱ्यांना यावर्षी खरीप हंगाम मध्ये  मोठ्या प्रमाणात फायदा होईल, अशी अपेक्षा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाचे  तसेच ते राबविणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.
                        या वेळी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधान सभा सदस्य आमदार नितीन देशमुख जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ,जैविक मिशनचे आरीफ शहा,जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे,उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, अरुण वाघमारे, तालुका कृषी अधिकारी डी.एस. प्रधान, तालुका तंत्र व्यवस्थापक विजय शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी के. एम.फुलारी,कृषी सहाय्यक अशोक करवते यांच्यासह गोपाल दातकर, गुरुकृपा शेतकरी गटाचे अध्यक्ष वैकुंठ ढोरे ,सुनील सिरसाट शेतकरी गटातील सदस्य  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ