६३२ मजूरांना घेऊन श्रमिक रेल्वेगाडी बिहारकडे रवाना


अकोला,दि.२१ (जिमाका)- अकोला ते खगरिया बिहार येथे  ६३२  मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे आज दुपारी दोन वाजता अकोला येथून रवाना करण्यात आली. यात नागपूर येथून आणखी ९५०  मजुरांना बसवण्यात येणार आहे. अकोला रेल्वेस्थानक येथून दुपारी  ही रेल्वे रवाना झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार घुगे व  खेडकर तसेच रेल्वेचे अन्सारी व नवले  हे अधिकारी उपस्थित होते. या रेल्वेत १५६० प्रवासी नेण्याची क्षमता होती. त्यात अकोला येथून अकोला जिल्ह्यातील ३००, बुलडाणा येथील ३३, वाशीम २७०, यवतमाळ येथील ३१ असे ६३२ जण रवाना झाले. त्यांत पुढे नागपूर येथून  ९५० जण बसविण्यात येणार होते. यासर्व मजूरांचे प्रवास भाडे हे मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आले असून त्यांना जातांना जेवणाचे पॅकेट, पाण्याची बाटली, अल्पोपहारासाठी बिस्कीट्स देण्यात आले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो तथा नोडल अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ