२३२ अहवाल प्राप्तः १८ पॉझिटीव्ह, २३ डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि.१९ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१४ अहवाल निगेटीव्ह तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आधीच मयत झालेल्या एकाचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला तर  आधीपासून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. असे दोघे जण आज मयत झाले. तर काल (दि.१८) आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २७९ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात ११५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २८२६ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २७५४ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २४७५ अहवाल निगेटीव्ह तर २७९ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  ७२ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण २८२६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २५८३, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३४ नमुने होते. आजपर्यंत एकूण २७५४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २५११ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २४७५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २७९ आहेत. तर आजअखेर ७२ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज १८ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या २३२अहवालात २१४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  आज प्राप्त झालेल्या पॉझिटीव्ह अहवालांपैकी ११ पुरुष आणि सात महिला आहेत. तर त्यातील चार जण हे भीम चौक अकोट फैल येथील तर अन्य सोनटक्के प्लॉट जुने शहर,  सिंधी कॅम्प,  मुजप्फरनगर लकडगंज,  आंबेडकरनगर बसस्टॅंड मागे,  फिरदौस कॉलनी,  दगडी पूल, बैदपूरा,  आदर्श कॉलनी सिंधी कॅम्प,  अकोली बुद्रुक गीतानगर जुनेशहर,  हाजीनगर अकोट फैल, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट,मोमीनपुरा ताजनापेठ, रंगारहट्टी बाळापुर येथील रहिवासी आहेत. तर  चिराणीया कंपाऊंड, रामदास पेठ येथील व्यक्ती काल (दि.१८) मयत झाला होता.त्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी कळविले आहे.
दोघांचा मृत्यू
आज सायंकाळी प्राप्त अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. ही व्यक्ती चिराणीया कंपाऊंड रामदास पेठ येथील ६८ वर्षीय व्यक्ती आहे. ही व्यक्ती दि.१६ रोजी दाखल झाली होती तर काल (सोमवार दि.१८ ) मृत्यू झाला. त्यांचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला. तर आज उपचार घेतांना आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण  ६२ वर्षीय व्यक्ती असून सावंतवाडी रणपिसेनगर येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती दि.१५ रोजी दाखल झाला होता. त्यांचा अहवाल दि.१७ रोजी पॉझिटीव्ह आला होता. उपचार सुरु असतांना आज ही व्यक्ती मयत झाली.
आदल्या रात्री २३ डिस्चार्ज
दरम्यान काल (दि.१८) रात्री आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. यातील  आठ  जण खैर मोहम्म्द प्लॉट येथील तर तीन जण आंबेडकर नगर, तीन जण रामनगर सिव्हील लाईन्स येथील तर उर्वरीत  ओल्ड आळशी प्लॉट,  माळीपुरा,  फिरदौस कॉलनी,  गोकुळ कॉलनी,  तारफैल, भीमनगर,  सराफा बाजार, जुनी शहर पोलीस चौकी, अकोट फैल  या भागातील रहिवासी आहेत. आता एकूण डिस्चार्ज दिलेल्या व्यक्तिंची संख्या १४४ झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने  दिली आहे.
११५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत  २७९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २० जण (एक आत्महत्या व १९ कोरोनामुळे) मयत आहेत. काल सोमवार दि.१८ रोजी  २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४४ झाली आहे. तर सद्यस्थितीत ११५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर २७७३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १६०९ गृहअलगीकरणात तर ७५ जण संस्थागत अलगीकरणात  असे १६८४ जण अलगीकरणात आहेत. तर ९५६ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १३३ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ