पालकमंत्र्यांनी केली प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी


अकोला,दि.१३(जिमाका)-कोरोना संसर्गाच्या सर्वाधिक प्रादुर्भावाचे केंद्र ठरलेल्या महापालिका हद्दीतील विविध प्रतिबंधित क्षेत्रांची आज राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज पाहणी केली.
 यावेळी त्यांचे समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी  प्रतिबंधित क्षेत्राचा नाकेबंदी केलेला भाग, तेथील सार्वजनिक स्वच्छता, अन्य नागरी सुविधा  तसेच नागरिकांना येणाऱ्या अन्य अडचणी व त्यांचे  अन्य प्रश्न याबाबत त्यांनी विचारपूस केली. नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहन ही केले. याभागातील नागरिकांना कोणत्याही कारणासाठी बाहेर पडावे लागू नये यासाठी त्यांना जास्तीत जास्त सुविधा घरपोच देण्याबाबत त्यांनी सुचना केली. स्थानिक स्वस्तधान्य दुकानदारांच्या वतीने शिधापत्रिकाधारकांना घरपोच धान्य द्यावे, असेही त्यांनी सुचना केली.
 न्यू भीमनगर भागात ज्या कुटूंबांना जेवणाची सोय नसेल त्यांच्यासाठी तेथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करावे असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. आजच्या भेटीत ना. कडू यांनी  बैदपुरा. माळी पुरा, खैर मोहम्मद प्लॉट,  कृषिनगर, न्यू भीमनगर आदी भागांची पाहणी केली याभागातील झालेले आरोग्य सर्वेक्षण, प्रत्यक्ष रुग्णाचे घर व त्यांच्या संपर्कातील लोक यांचा संपर्क शोधून त्यांच्या आरोग्य तपासणीसाठीची यंत्रणा त्यांनी समजावून घेतली. या यंत्रणेने संपर्क शोधून अधिकाधिक संदिग्ध रुग्ण शोधून चाचण्या करुन घ्याव्यात अशा सुचनाही त्यांनी केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ