उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अंशतः कामकाजास सुरुवात


अकोला,दि.१८(जिमाका)-   राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे कामकाज हे आज (स्पमवार दि.१८) पासून अंशतः सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली असून  उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला येथे  नवीन वाहनांची नोंदणी करण्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाहन वितरकांनी BS-VI या संवर्गातील वाहनांची  नोंदणी प्रक्रिया सुरु करावी. ही नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील  कामकाज लॉकडाऊन कालावधीत केवळ जिवनावश्यक वस्तुंची वाहतुक करण्यासाठी द्यावयाचे ई- पास यासाठी सुरु होते.  मात्र शासनाने दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती अनिवार्य केली असून  त्याअनुषंगाने कामकाज सुरु करण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ