स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ मुंबई , दि.२३ : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२५ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) , तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी , २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक १ जानेवारी , २०२५ ते ३१ डिसेंबर , २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव , महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ , रवींद्र नाट्यमंदिर इमारत्त , दुसरा मजला , सयानी मार्ग , प्रभादेवी , मुंबई ४०० ०२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा