शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासकांचे कार्यालय कार्यान्वित ;तक्रार निवारणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती


अकोला दिनांक २४(जिमाका)- अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काल नियुक्ती केली. त्यांच्या अधिपत्याखाली आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध बाबींचे गुणवत्ता संवर्धनाचे कामकाज पाहिले जाणार आहे.  या संदर्भात प्रशासकांचे कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यान्वित झाले आहे. या रुग्णालयाच्या  स्वच्छता, रुग्णांचे जेवण, तसेच रुग्णालयाच्या अन्य सेवांसंबंधित तक्रारींच्या निवारणासाठी  जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके हे सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळात उपस्थित राहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१८९२८४५ हा आहे. तर महिला बालकल्याण अधिकारी जवादे हे  दुपारी दोन ते सायंकाळी सात यावेळात  उपस्थित राहतील. त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४३१२५३१ हा आहे. नागरिकांनी  आपल्या तक्रार निवारणासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ