कापूस खरेदीसाठी मंगळवार पूर्वी (दि.२६) नोंदणी करण्याचे आवाहन


अकोला,दि.२१ (जिमाका)- जिल्ह्यात सर्व बाजार समितीमध्ये कापूस खरेदी करता सुरु असलेली नोंदणी ही मंगळवार दि.२६ पर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर कापूस खरेदीसाठीची नोंदणी बंद करण्यात येणार आहे, तरी ज्या शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी नोंदणी करावयाची असेल त्यांनी  मंगळवार दि.२६ पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.
अकोला कापूस फेडरेशन तसेच सी.सी.आय मार्फत किमान आधारभुत किंमत खरेदी अंतर्गत कापुस खरेदी सुरु आहे. कापुस खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात कापूस फेडरेशनकडून आज पर्यंत एकूण ४३३८ शेतकऱ्यांचा १२१९८५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तसेच सी.सी.आय कडून २८१९९ शेतकऱ्यांचा ८६०१६८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अजूनही काही शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करणे बाकी आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, जिल्ह्यात सर्व बाजार समितीमध्ये कापूस खरेदी करता सुरु असलेली नोंदणी ही मंगळवार दि.२६ पर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर कापूस खरेदीसाठीची नोंदणी बंद करण्यात येणार आहे. तसेच सी.सी.आय.चे बार्शीटाकळी कापूस खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी कापूस खरेदीकरीता नोंदणी केली असून त्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. त्या शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी ही सी.सी.आय. तसेच बाजार समिती प्रशासनाव्दारे नियोजन करुन शुक्रवार दि.२९ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात येणार असून त्यानंतर बार्शीटाकळी कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात येणार आहे. तरी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी व दिलेल्या दिवशी कापूस विक्री साठी केंद्रावर आणावा. शेतकऱ्यांकडील कापूस पावसाळा सुरु होणे पूर्वी खरेदी करण्याबाबत प्रशासनाकडून कापूस फेडरेशन व सी.सी.आय यांना वेळोवळी सुचित करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अजून कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे, त्या शेतकऱ्यांनी मंगळवार दि.२६ पर्यत नोंदणी करावी, असे आवाहन  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ