राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या लोकांना अलगीकरण अनिवार्य


अकोला,दि.१७(जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून अकोला जिल्ह्यात विविध तालुक्यात येणाऱ्या लोकांना  वैद्यकीय तपासणी व त्यानंतर  दहा दिवसांसाठी अलगीकरण हे अनिवार्य आहे. ज्या नागरिकांकडे घरी गृह अलगीकरण राहण्याची व्यवस्था नसेल त्यांना त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये  किंवा आवश्यकतेनुसार अन्यत्र अलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
यासंदर्भात  बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीची आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यास डॉक्टरी सल्ल्यानुसार  दहा दिवस अलगीकरणात राहणे अनिवार्य आहे. जर अशा व्यक्तींच्या घरी अलगीकरणात राहण्याची व्यवस्था नसेल तर त्या त्या गावच्या जिल्हा परिषद शाळेत अथवा अन्यत्र व्यवस्था करावी. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी निर्देश दिले होते.
जिल्ह्यात आतापर्यंत ५९८८ लोकांना जिल्हा प्रशासनाने ई- पास दिले आहेत. त्यात अकोला तालुक्यात ३६५३, अकोट तालुक्यात ५४०, बाळापुर तालुक्यात ३४७, बार्शी टाकळी ३३४,  मुर्तिजापूर ४६८,  पातूर ३१४,  तेल्हारा ३३२ असे एकूण ५९८८ ई पासेस देण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक यंत्रणांनी या नागरिकांच्या अलगीकरणाची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ