आधारभूत किंमत भरड धान्य खरेदीस प्रारंभ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- पालकमंत्र्यांचे आवाहन

अकोला,दि.१३(जिमाका)- पणन हंगाम २०१९-२० (रब्बी) मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरडधान्य (ज्यारी, मका) खरेदी करण्याबाबत राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून ज्वारी, मका खरेदी करण्यात यावे सुचना प्राप्त झालेल्या आहेत.  ही खरेदी ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून  शेतकऱ्यांनी तालुका खरेदी  विक्री संघात जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.
                        यासंदर्भात  अधिक माहिती अशी की, शासन निर्णयातील, सुचनेनुसार एफएक्यु (Fair Average Quality ) दर्जाचे भरडधान्य (ज्वारी, मका) तालुका सहकारी खरेदी विक्री संस्थामार्फत करण्यात येणार आहे. त्याचा  खरेदी कालावधी  ३० जून पर्यंत आहे. ही खरेदी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येईल. त्याकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका खरेदी विक्री संस्थेमध्ये जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी., असे आवाहन ना. कडू यांनी केले आहे. ही खरेदी ७/१२ नोंदीनुसार पिकाखालील क्षेत्र व उत्पादकता विचारात घेऊनच मका व ज्वारीची खरेदी करण्यात येणार असून  शासन निर्णयानुसार भरडधान्य खरेदीचे दर खालील प्रमाणे आहेत.
१)ज्वारी (संक्ररीत) आधारभूत किंमत २५५० रुपये प्रतिक्विंटल
२)ज्वारी (मालदांडी) २५७० रुपये प्रतिक्विंटल
३)मका १७६० रुपये प्रतिक्विंटल
हेच दर शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.
 त्यासाठी अकोला जिल्ह्यात १८ मे  पासुन पणन हंगाम २०१९-२० (रब्बी) ज्वारी मका नोंदणी व खरेदीस सुरवात होत आहे, तरी जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ