१२३ अहवाल प्राप्तः १२ पॉझिटीव्ह, ३५डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि.३० (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १२३अहवाल प्राप्त झाले. त्यातील १११ अहवाल निगेटीव्ह तर १२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारपर्यंत ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या पाच जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित ३० जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.  दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७० झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ५२२४ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९५०, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५२०७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९३३ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४६३७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५७० आहेत. तर आजअखेर १७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज १२ पॉझिटिव्ह
आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण बाळापूर, आलेगाव पातूर, तसेच रामदासपेठ, शरीफ नगर, राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत.
आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व दोन पुरुष आहेत.  ते अकोट फैल, गायत्रीनगर,  सिटी कोतवाली , मोहता मिल, सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहेत.
एकाचा मृत्यू
आज पहाटे एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. हा रुग्ण साईनगर डाबकी रोड येथील रहिवासी होता. तो दि.२४ रोजी दाखल झाला होता.
३५ जणांना डिस्चार्ज
आज दुपारनंतर  ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील पाच जणांना घरी तर उर्वरित ३० जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यात १३ महिला व २२ पुरुष आहेत. त्यातील  सात जण हरिहर पेठ, चार जण गायत्रीनगर, कच्ची खोली दोन, जुने शहर दोन, अकोट फैल दोन, सिव्हिल लाईन्स दोन,  मोठी उमरी दोन,  गोकुळ कॉलनी दोन,  तर आंबेडकर नगर, सागर कॉलनी, चांदखां प्लॉट,  सोनटक्के प्लॉट,  इंदिरा नगर,  अडगाव, खदान, रामदास पेठ,  शास्त्रीनगर, अशोकनगर, मोमीनपुरा, पार्वतीनगर डाबकीरोड येथील  रहिवासी आहेत.
११७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ५७०  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३० जण (एक आत्महत्या व २९ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर आज ३५ जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ४२३  झाली आहे. तर सद्यस्थितीत ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे. तर आज एका रुग्णाला नागपूर येथे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर ४९४४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २५२६ गृहअलगीकरणात तर ६७ जण संस्थागत अलगीकरणात  असे २५९३ जण अलगीकरणात आहेत. तर २१८० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १७१ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ