रेडक्रॉसचा उपक्रमःजिल्हा कारागृहात होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप


अकोला दिनांक २४(जिमाका)- येथील जिल्हा कारागृहात होमिओपॅथी डॉक्टर्स संघटनेतर्फे  रेडक्रॉस संस्थेमार्फत  कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून  आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.२२) पार पडला.
                           यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे या मान्यवरांच्या हस्ते बंदीजनांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. वरिष्ठ तुरुंग अधिकारी एस. बी. निर्मळ, तुरुंग अधिकारी एम. के. बनसोड व राजेश राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ आर्य, रेड क्रॉस चे उपाध्यक्ष डॉ. किशोर मालोकार, मानद सचिव प्रभजीत सिंह बछेर, मानद व्यवस्थापक डॉ.मोहन काजळे, होमिओपॅथी डॉक्टर संदीप चव्हाण याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हा कारागृहात बंदिवान आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना होमिओपॅथीचे औषधाचे(४५०/ यूनिट) वितरण  करण्यात आले.
                           याप्रसंगी आ. गोवर्धन शर्मा म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लढ्यात सामाजिक बांधिलकी जपून सर्व घटकांना औषधाच्या वाटप माध्यमातून होणारे रेडक्रॉसचे कार्य अनुकरणीय आहे. तर आ.रणधीर सावरकर म्हणाले की, कोरोना सारख्या आपत्तीच्यावेळी असे उपक्रम हाती घेणे ही रेडक्रॉस ची परंपरा असून त्यासाठी संस्था अभिनंदनास पात्र आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की, रेडक्रॉस सारखे उपक्रम इतर सामाजिक संस्थांनी हाती घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन धनंजय मिश्रा यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ