अकोला शहरात प्रतिबंधित क्षेत्रातील ठोक व्यापाऱ्यांना माल अन्यत्र हलविण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी आज(दि.१५) व उद्या(दि.१६) मुभा


अकोला,दि.१४(जिमाका)-  लॉक डाऊन मुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात अनेक होलसेल व्यापाऱ्यांची दुकाने व गोदामे बंद असून त्यातील माल अन्यत्र सुरक्षित ठिकाणी हलविण्यास परवानगी अनेक व्यापाऱ्यांनी मागितली आहे. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी  प्रतिबंधित क्षेत्रातील व्यापाऱ्यांना माल हलविण्यासाठी शुक्रवार दि.१५ व शनिवार दि.१६ या दोन दिवसांत मर्यादित कालावधीसाठी मुभा दिली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात माल हलविण्यासाठी व्यापाऱ्यांना देण्यात आलेली सवलत याप्रमाणे-
शुक्रवार दि. १५ रोजी  किराणा बाजार (सकाळी आठ ते १२), कोठडी बाजार (दुपारी १२ ते चार), जीएमडी मार्केट (सकाळी आठ ते १२)
शनिवार दि. १६ रोजी  जुना भाजीबाजार (सकाळी आठ ते १२), दाणा बाजार (दुपारी १२ ते चार) या प्रमाणे.
या व्यापाऱ्यांना  एक वाहन सोबत दोन हमाल यांना आणण्याची परवानगी राहील. हे वाहन व हमालही प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील असणे आवश्यक आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ