आयएमएचा प्रशासनाला सहयोग; खाजगी डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित


अकोला,दि.२(जिमाका)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना प्रादुर्भाव झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपचारासाठी दाखल होत आहेत. अशावेळी कोविड व्यतिरिक्त अन्य आजारांच्या वैद्यकीय उपचारांसाठी इंडियन मेडीकल असोसीएशन, शाखा,अकोला यांचे कडील डॉक्टरांची वार्डनिहाय रुग्ण सेवा देण्याबाबतची यादी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्याल, अकोला यांनी सादर केली असून या यादीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मान्यता दिली असून एका आदेशाद्वारे आयएमए या संघटनेच्या सहकार्याने खाजगी डॉकटर्सच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत.
आता या डॉक्टरांची नॉन कोवीड रुग्ण सेवे बाबत सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत व आवश्यकता असल्यास तसेच रुग्णांची संख्या वाढल्यास अधिष्ठाता यांचे निर्देशानुसार उपस्थीत राहण्याबाबत मंजूरी देण्यात आली आहे.तरी या डॉक्टर्सनी आपली सेवा देण्यासाठी उपस्थित रहावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
यात सेवा देणारे डॉक्टर्स याप्रमाणे-
दि.२१ रोजी -वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ. महेश गांधी, डॉ श्रीपाद रत्नाळीकर,  बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ सतीश विरवाणी डॉ राम देवळे,
दि. २२ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ अश्वीन खांदरे, डॉ सुमेध दुलदुले बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ मंत्री,  डॉ. सारडा
 दि. २३ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ मनिष श्रीवास्तव, डॉ. योगेश वर्ग, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ.नितीन विरवाणी, डॉ.पंकज पाटील,
दि.२४ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी  डॉ.आशिष डेहनकर, डॉ. स्वप्नील वय(Wath),
दि.२५ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी  डॉ.समिर मालविय, डॉ.प्रशांत अग्रवाल, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ.निखील पनपालीया, डॉ.जयराज कोरपे,
दि.२६ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ.प्रमोद चिराणीया, डॉ प्रशांत वायचाळ, डॉ.सौरभ बिलाला, डॉ.सतिश गुप्ता,
दि.२७ रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी  डॉ.अरविंद चौव्हाण,डॉ.अयेशन देशमुख, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ.अश्विन सदावर्ते,डॉ. पियुष भिसे
दि.२८ रोजी-वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी  डॉ.अनिरुध्द भांबुरकर,डॉ.अभय जैन, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ. जुबेर खान, डॉ.झिशान हुसेन,
दि.२९ रोजी – वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ.रविंद्र सिंधी, डॉ.अमर सुलतान बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ. अमोल भगत,
दि.३० रोजी- वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ.श्रीकांत काळे, डॉ. राम बिहाडे, बाह्यरुग्ण तपासणीसाठी डॉ.सदानंद भुसारी,डॉ.श्याम देवीकर,
दि.३१ रोजी – वार्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ. अडगांवकर, डॉ. नवल मानधने यांचा समावेश आहे.
 हे सर्व डॉक्टर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता यांच्या निर्देशानुसार आपली सेवा देतील व अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला यांनी केलेल्या कार्यवाही बाबत दैनदिन अहवाल नियमीत पणे या कार्यालयास सादर करावा,असे आदेशात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ