१७२ अहवाल प्राप्तः सात पॉझिटीव्ह, १६५निगेटीव्ह; एका महिलेचा मृत्यू


अकोला,दि.१० (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १७२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १६५ अहवाल निगेटीव्ह तर सात अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १५४ झाली आहे. आज सकाळी उपचार सुरु असतांना एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १२७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण १७३७ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १५७८ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण १४२४ अहवाल निगेटीव्ह तर १५४ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  १५९ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण १७३७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १५३८, फेरतपासणीचे ९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १५७८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १३७९ तर फेरतपासणीचे ९७ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४२४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १५४ आहेत. तर आजअखेर १५९ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १७२ अहवालात १६५ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर सात अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुणांपैकी पाच पुरुष व दोन महिला आहेत.हे रुग्ण मोहम्मद अली रोड, रामनगर सिव्हिल लाईन्स, बैदपूरा, तारफैल भवानी पेठ, दगडीपूल जुने शहर व गवळीपूरा येथील रहिवासी आहेत. सायंकाळी पॉझिटीव्ह आढळलेली महिला ही फतेह चौक या भागातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
दरम्यान आज सकाळी एका ५० वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही महिला खैर महम्मद प्लॉट येथील रहिवासी होती. ती गुरुवार दि.७ रोजी दाखल झाली होती.
१२७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत  १५४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील तेरा जण (एक आत्महत्या व १२ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना तर बुधवार दि.६ मे  रोजी एकास असे १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १२७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर १४४८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ७६४ गृहअलगीकरणात व ६९ संस्थागत अलगीकरणात असे ८३३ जण अलगीकरणात आहेत. तर ४७० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १४४ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ