१० वी, १२ वी उत्तर पत्रिका तपासणी कामासाठी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतरांना संचारबंदीतून सवलत
अकोला,दि.८ (जिमाका)-
इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षांचे निकाल वेळेत घोषित करता यावेत या
साठी उत्तर पत्रिका तपासणे, निकालाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या कामांसाठी संचारबंदीतून सवलत
देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
यासंदर्भात निर्गमित
आदेशात म्हटले आहे की, इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या उत्तर पत्रिकांची तपासणी
करुन वेळेत निकाल प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याने नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांना संचारबंदीतून सवलत देण्यात येत आहे. कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागु
करण्यात आलेल्या संचारबंदीमधुन संबंधीत अधिकारी/ शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी व
अन्य संबंधीत कर्मचारी यांना उत्तरपत्रिका परिक्षा केंद्रावरुन किंवा पोष्टातून
संबंधीत शाळा/ महाविद्यालयास पोहचविणे, उत्तरपत्रिका शाळेतून परिक्षकाच्या घरी
घेऊन जाणे, परिक्षकाकडून नियामक (मॉडरेटर्स) कडे
उत्तरपत्रिका पोहचविणे, नियामकांकडील उत्तरपत्रिका विभागीय मंडळाकडे
जमा करणे इत्यादी कामाकरीता तसेच इतर संबंधीत कामाकरीता अटी व शर्तीवर त्यांचे
प्रवासाकरीता परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
अटी व शर्ती-
१)संबंधित
कर्मचाऱ्यांनी संबंधित कामाकरीता मंडळाने दिलेले आदेश व स्वतःचे ओळखपत्र जवळ
बाळगणे बंधनकारक राहिल.
२) महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
पुणे यांच्या अधिनस्त विभाग्फ़ीय मंडळातील
अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांना प्रवास करता येईल.
३) ही सुट
खाजगी/ सार्वजनिक वाहनास अथवा मंडळाच्या ठेकेदाराकडील भाडेतत्त्वावर घेतलेल्या
वाहनांना राहिल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा