१५८ अहवाल प्राप्तः १४ पॉझिटीव्ह, १५ डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि.२२ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १५८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४४ अहवाल निगेटीव्ह तर १४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.२१) आणखी  १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दोन जणांचा मृत्यू झाला,त्यांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३५५ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात १२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ३३५५ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३३३२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २९७७ अहवाल निगेटीव्ह तर ३५५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  २३ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ३३५५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३१०७, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३३३२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०८४ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २९४४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३५५ आहेत. तर आजअखेर २३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज १४ पॉझिटिव्ह
आज  दिवसभरात १५८अहवाल प्राप्त झाले. त्यात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात तीन महिला व पाच पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी दोघे फिरदौस कॉलनी तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर,  गोकुळ कॉलनी  येथील रहिवासी आहेत. पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून  ती वर्धा येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जि.प. शाळेतील अलगीकरण कक्षातच होती.
तर आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या सहा अहवालात एक महिला व पाच पुरुषांचे अहवाल आहेत. यात जुने शहर, अकोट फैल,  गोकुळ कॉलनी जवाहर नगर,  मलकापूर अकोलाहमजा प्लॉट वाशिम बायपास व  मुजावरपुरा ता. पातूर येथील रहिवासी आहेत.
दोघे मयत
दरम्यान दोन रुग्ण मयत झाले आहेत. हे दोन्ही रुग्ण हे मंगळवार दि.१९ रोजी दाखल झाले होते. ते त्याच दिवशी मयत झाले. त्यांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील एक रुग्ण ५० वर्षीय महिला असून ती नायगाव येथील रहिवासी आहे. तर अन्य एक ५२ वर्षीय पुरुष असून तो बाळापूर रोड अकोला येथील रहिवासी आहे.
१५ जणांना डिस्चार्ज
तसेच काल (दि.२१) रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील १२ जण कोवीड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर तिघांना घरी सोडण्यात आले आहे.  त्यात माळीपुरा येथील चार, रेल्वे कॉलनी येथील तीन,  लकडगंज येथील दोन, अकोट फैल येथील दोन, तर सिटी कोतवाली,  समता नगर, पूरपिडीत क्वार्टर, गुलजारपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
१२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत   जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २३ जण (एक आत्महत्या व २२ कोरोनामुळे) मयत आहेत. काल गुरुवार दि.२१ रोजी रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या २०६  झाली आहे. तर सद्यस्थितीत १२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर ३३१८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १९९८ गृहअलगीकरणात तर १३५ जण संस्थागत अलगीकरणात  असे २१३३ जण अलगीकरणात आहेत. तर १०४७ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १३८ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ