३०८ अहवाल प्राप्तः ७२ पॉझिटीव्ह, २६ डिस्चार्ज


अकोला,दि.२७ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सात वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ३०८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २३६ अहवाल निगेटीव्ह तर ७२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या पाच जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित २१ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५०७ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात १६४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४६५८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४४०६, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ४६०७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४३५५ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४१०० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५०७ आहेत. तर आजअखेर ५१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज ७२ पॉझिटिव्ह
आज सकाळी  प्राप्त अहवालात ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. त्यात  १० महिला तर २० पुरुष रुग्ण आहेत. त्यातील १३ जण हे हरिहर पेठ येथील  रहिवासी आहेत. तर मोहता मिल प्लॉट नाजुकनगर,  मोठी उमरी,  गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल,  सहकार नगर, डाबकी रोड,  वृंदावन नगर,  देशमुख  फैल,  चांदखा प्लॉट वाशिम बायपास,  फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.
आज सायंकाळी प्राप्त  ४२ पॉझिटीव्ह अहवालात १९ महिला व २३ पुरुष आहेत. त्यात  अकोट फैल येथील अकरा,  रामदास पेठ येथील पाच, माळीपुरा येथील पाच, मुर्तिजापूर येथील तीन, फिरदौस कॉलनी येथील दोन,  अशोक नगर येथील दोन, डाबकी रोड येथील दोन,  तर उर्वरित  महसूल कॉलनी, रजतपुरा,  गायत्रीनगर, सिंधी कॅम्प, गर्ल्स होस्टेल आरटीएएम,  शिवसेना वसाहत, देशमुख फैल,  संताजीनगर, जठारपेठ, न्यू तारफैल, गुलिस्तान कॉलनी. मोमीनपुरा येथील प्रत्येकी एक जण आहे.
२६ जणांना डिस्चार्ज
तर आज दुपारी  २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील २१ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. यात  नऊ महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे.
१६४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ५०७  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २८ जण (एक आत्महत्या व २७ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर आज २६ जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ३१५  झाली आहे. तर सद्यस्थितीत १६४  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर ४३०७ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २२७९ गृहअलगीकरणात तर १६५ जण संस्थागत अलगीकरणात  असे २४४४ जण अलगीकरणात आहेत. तर १७०७ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.  तर १५६ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ