जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीः विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा



अकोला दिनांक २९(जिमाका)-  जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढण्याची कारणे, जिल्ह्यातील उपचार सुविधा व अलगीकरणाच्या सुविधा, वैद्यकीय उपचार यंत्रणेतील  मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, सुरक्षासाधनांचीआवश्यकता इ. बाबींचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
                         जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त  संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,डॉ. अष्टपुत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.
 यावेळी त्यांनी यंत्रणेला सुचना केल्या की, उपचार पद्धतीसंदर्भात इंडीयन मेडीकल कौन्सिल कडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांचा काटेकोर अवलंब करा. मुंबई पुणे यासारख्या शहरांमधून परतलेल्या नागरिकांवर काटेकोर लक्ष ठेवा. जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढ रोखणे, मृत्यूदर कमी करणे यावर विशेष लक्ष द्या. जे जे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत त्या त्या रुग्णांना उत्तम जेवण व  अन्य सेवा पुरवा. जिल्ह्यातील ग्रामिण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात यावी व मनुष्यबळ वाढवावे.  रुग्णालयांचे निर्जंतूकीकरण, स्वच्छता याबाबींवर विशेष लक्ष द्या, अशा सुचना सिंग यांनी केल्या. ते म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व लोकांना नॉन कोवीड उपचार सुविधा उपलब्ध आहेत. या योजनेत जे जे खाजगी रुग्णालये संलग्नित असतील त्या रुग्णालयांमध्ये  कोवीड व्यतिरिक्त अन्य उपचार सुविधा सुरु करा व त्या सुविधा देण्यास सुरुवात करा. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करा, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ